
कवी / लेखक मयुर सुरेश सांगळे
लेखक मयूर सुरेश सांगळे (बी ए मराठी स्पेशल मानसशास्त्र अभ्यासक कम्प्युटर सायन्स अँड आयटीआय इलेक्ट्रिशन ) अप्रती साहित्य संघ संचालक लेखन प्रतिनिधी काव्यसंग्रह (स्त्रीत्व एक अद्भुत भावना, साथ तुझी, निसर्गाची किमया ,झुळूक .)
कवी कुसुमाग्रज हे नाव हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. यांनी मराठी भाषेत साहित्याचा खूप आवाका वाढविला अनेक कथा, कादंबरी व नाटक लिहली. त्यातील नटसम्राट या नाटकास साहित्यसंघ पुरस्कार मिळाला. व तसेच विशाखा या कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. अश्या कलावंताच्या कर्मभूमीत नाशिक मधील नांदगाव तालुक्यात मनमाड मध्ये माझा जन्म झाला आणि माझे बालपण तिथेच बहरले. तसेच माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तिथेच पूर्ण झाले. माझ्या शालेय जीवनात वकृत्व स्पर्धा वार्षिक स्नेहसंमेलन अशा विविध उपक्रमात मी सहभाग नोंदवला. याच प्रभावाने मी हळुवार लेखन सुरू केले आणि तिथूनच खरंतर मला लेखनाला प्रेरणा मिळाली. अगदी बारकाईने निरीक्षणाची आवड असल्या कारणाने मला लिखाणाला खूप सारी मदत व्हायची. तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचा सहवास लाभल्याने मी अनुभवाच्या जोरावर लिखाण वाढविले आणि त्यातूनच विविध संघटना व वृत्तपत्रां मार्फत माझ्या लेखनास प्रसिद्धी मिळाली.
Contact
कोणत्याही प्रश्नासाठी किंवा सूचनांसाठी आमच्याशी संपर्क साधा
apratigroupwriter08@gmail.com
Phone
+91 9561155370
Address
Manmad ,tel- Nandgaon
महाराष्ट्र